मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पुन्हा एकदा लेटरवॉर सुरु झाले असल्याचे पहायला मिळत आहे. आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली आहे.
तर मुख्यमंत्र्यांनी लगेचच या पत्राला उत्तर दिले आहे. ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला पत्रानेच उत्तर दिलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून देशातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, तशी मागणी आपण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी मुख्यमंत्र्यांनी पत्रातून म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावरुन भाजप नेते चांगेलच आक्रमक झाले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. ‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला अशाप्रकारचं उत्तर देणं दुर्दैवी आहे. तसेच त्यांनी राज्यपाल किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा वाद प्रत्येक ठिकाणी उभा करणं हे देखील दुर्दैवी आहे.
राज्यपालांनी शेवटी राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, पालकत्वाच्या दृष्टीनं भूमिका मांडली आहे. राज्यपालांनी केलेल्या सूचना सकारात्मक घ्यायला हव्या. आपण विचारलेल्या प्रश्नाला सांगितलेल्या सूचनेविषयी केंद्राकडे बोट दाखवून दूर पळता येणार नाही. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात विनयभंग, अत्याचार, बलात्कार, हत्येच्या घटना हजारोंच्या संख्येनं झाल्या आहेत. अशावेळी साकीनाक्याची घटना तर परिसीमा होती. मग अशावेळी राज्यापालांनी जर सुचवलं असेल, वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी, महिला संघटनांनी मागणी केली असेल, तर मला वाटतं अशाप्रकारचं अधिवेशन घ्यायला काहीच हरकत नाही’, असे स्पष्ट मत प्रवीण दरेकर यांनी मांडले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोर्नोग्राफी प्रकरण: अखेर राज कुंद्राची दोन महिन्यानंतर सुटका
- दानवेंना मी या आठवड्यात दोनदा भेटलो, असेच भेटत राहिलो तर…; देसाईंच्या विधानामुळे चर्चांना उधाण
- ‘..तर युपीत रोज अधिवेशन घ्यावे लागेल’, राज्यपालांच्या मागणीवर शिवसेनेची प्रतिक्रिया
- ‘सुप्रिया ताई, सोमय्यांचे लक्ष सध्या बेनामी संपत्तीवर; वांग्याच्या शेतीकडे वळाले तर तुमचे अवघड होईल’
- …अन् संजय राऊत तडक म्हणाले, ‘किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
