कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.
तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसकडूनही आपला गड राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यातील ब्रिगेड मैदानात सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.
ममता बॅनर्जी यांनी सिलिगुडीमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात पदयात्रा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला. पंतप्रधान मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. बंगालमध्ये परिवर्तन होणार असं म्हणतात. परंतु खरं परिवर्तन तर दिल्लीत होणार आहे असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
‘परिवर्तन आता बंगालमध्ये नाही तर दिल्लीत होणार आहे. ते म्हणाले बंगालमध्य महिला सुरक्षा नाही. परंतु उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य राज्यांकडे पाहा. बंगालमध्ये महिला सुरक्षितच आहेत. मी वन-ऑन-वन खेळण्यासाठी तयार आहे. जर त्यांना मतं खरेदी करायची असतील तर पैसे घ्या आणि तृणमूल काँग्रेसला आपलं मत द्या,’ असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार सर्वकाही विकत असल्याचाही आरोप केला.
महत्वाच्या बातम्या
- प्रशासन कडक वागेल तरच कोरोना आटोक्यात येईल – आ. अतुल सावे
- जिल्हा परिषद सदस्याच्या वाढदिवसाला कोरोना नियमांचा चुराडा
- शिवसेना नेत्याचे राज ठाकरेंना आव्हान, हिंमत असेल तर नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी
- ..म्हणून मला अंबानी-अदाणीबद्दल सहानुभूती, पंतप्रधान मोदींचा खुलासा
- कार्यालय झाले सुंदर पण अंगणातील नाल्याचे काय?


