Share

कार्यालय झाले सुंदर पण अंगणातील नाल्याचे काय?

Published On: 

नांदेड: जिल्हायातील हदगाव तालुक्यात असलेल्या तामसा रोडवरील पंचायत समिती कार्यालय हे ‘सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमाअंतर्गत सुंदर व आकर्षक दिसुन येते. मात्र कार्यालयाच्या प्रांगणात वाहत असलेल्या गटारगंगेमुळे कार्यालयात प्रवेश करणाऱ्या कर्मचारी व नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सर्व कार्यालय सुंदर असुनही प्रांगणातील गटार नाल्यामुळे कार्यालयाची शोभा गेली आहे.

हदगाव तालुक्यातील तामसा रोडवर असलेल्या पाच सहा एकर जागेवर नवीन तहसील कार्यालय अस्तीत्वात आहे. या कार्यालयात पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद लघु पाठबंधारे व इतर काही महत्वाची कार्यालये येथे कार्यरत आहेत. या कार्यालयाच्या भिंतीलगत गटार नाली आहे. मात्र नियोजन नसल्याने परिसरात या नाल्याचे घाण पाणी कार्यालयाच्या प्रांगणात जमा होते. कधी कधी या जमलेल्या पाण्याचे रुंपातर डबक्यात होते.

या घाणीमुळे कार्यालय परिसरात दुर्गंध पसरते. परिसरातील नागरिकांनी अनेकदा याची तक्रार केली मात्र प्रशासनाने कोणतीही उपाययोजना राबवली नाही. तहसील कार्यालाच्या अंतर्गत जर सर्व कार्यालयानी मिळून गटार नाल्याचे नियोजन केले असते. तर सुदंर कार्यालयासोबत कार्यालयीन परिसरही सुंदर झाला असता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!