उस्मानाबाद: राज्यात तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे वैद्यकीय समस्या उद्भवत आहेत तसेच रुग्णालयात देखील जागा मिळत नसल्याने अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. ही बाब लाक्षते घेता आता कोविड केअर सेंटरची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उमरग्यात रुग्ण संख्येची ५५० च्या पुढे वाटचाल सुरू असल्याने सोमवारी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील वसतिगृहात ६० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोरोना रुग्ण उपचारासाठी शहरात माऊली, खिचडे व विजय क्लिनिक येथे मान्यता देण्यात आली आहे.
उमरगा शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने आरोग्य यंत्रणा हतबल होत आहे. उपलब्ध सुविधा, वाढीव सुविधाचा पाठपुरावा करत आरोग्य यंत्रणेचे काम सुरू आहे. सरकारी कोविड सेंटरमध्ये ऐनवेळी जागेचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने शिवाई हॉस्पिटल, डॉ. के. डी. शेंडगे हॉस्पिटल, गजानन हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचाराला परवानगी दिली आहे. दरम्यान शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील वस्तीगृहातील कोविड केअर सेंटर सुरू करण्यास तहसीलदार संजय पवार यांनी परवानगी दिल्याने सोमवारी मुलींच्या वसतिगृहात आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे.
ऑक्सिजन सिलिंडर लातूरहून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. उमरगा शहरात नव्याने माऊली, खिचडे अन् विजय क्लिनिक येथे कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. आरोग्य यंत्रणेकडून त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- अष्टपैलु खेळाडू रविंद्र जडेजाचा जिवलग ‘वीर’ अनंतात कालवश; पोस्ट शेअर करत दिला निरोप
- कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आज पासून ‘या’ जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यु’
- नाशिकमध्ये धक्कादायक मृत्यूचे सत्र सुरूच, एकाच दिवशी चक्कर येऊन 11 जण दगावले
- लातूरच्या आरोग्यसेवेसाठी कॅलिफोर्नियातून मदत !
- ‘राज्यातले सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचे आता कॉग्रेससुद्धा बोलू लागली आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
