Share

रोहितसाठी चेंडु बदलता येतो राहुलसाठी का नाही; इरफान पठानने उपस्थित केला प्रश्न

Published On: 

चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार रोहित शर्माने १३ षटकानंतर चेंडु ओला झाल्याने दुसरा चेंडु मागवला होता. यावर मैदानावरील पंचानेही रोहितचे ऐकले आणि त्याला तत्काळ दुसरा चेंडु उपलब्ध करुन दिला. यावेळी समालोचन करत असलेले भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान पठानने या मुद्यावर बोट ठेवत आयपीएलमध्ये दोन संघात पंच भेदभाव करत आहे असे म्हणाला. दोन दिवसापुर्वी पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यात दुसऱ्या डावात पंजाबचा संघ गोलंदाजी करत असताना पंजाबचा कर्णधार के एल राहुलने चेंडु ओला झाला असल्याने बदलुन द्यावा अशी विनंती वारंवार पंचाकडे केली होती मात्र पंचानी ते नियमात बसत नसल्याचे सांगत त्याला नकार दिला होता.

मात्र मुंबईच्या संघाने तेच कारण समोर करत चेंडु बदलण्याची मागणी करताच चेंडु बदलुन देण्यात आला. यावर इरफान पठान म्हणाला की.’हा इतर संघावर एकप्रकारे अन्याय आहे. कारण पंजाबने याच कारणासाठी चेंडु बदलुन द्यावा अशी मागणी केली होती. मात्र पंचानी त्याला नकार दिला. मात्र मुंबईच्या संघाची मागणी पुर्ण करत भेदभाव केला आहे.’ यावेळी इरफान सोबत असलेले निखील चोपडा यांनी इरफानचा मुद्दा योग्य असल्याचे सांगत नियम हे सर्व संघासाठी एकसमान असावेत अशी मागणी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!