नाशिक – नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी या घटनेवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील या ऑक्सिजनवर हा अक्सिजन अनेक गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना लावण्यात आला होता. परंतु गळतीमुळे हा अक्सिजन वाया गेल्यामुळे रुग्णांना आता नवीन ऑक्सिजन कोठून उपलब्ध करून द्यावा अशी चिंता लागली आहे.
एका बाजूला हे सर्व चित्र असताना दुसऱ्या बाजूला राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं सरकारची चिंताही वाढली आहे. बिकट परिस्थिती बनल्याने रुग्णांना ऑक्सिजन बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा जाणवत आहे. वाढत्या रुगासंख्येमुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा अक्षरशः उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- भोरमधील तीनशे वर्षांची परंपरा खंडीत, श्रीराम जन्मोत्सव सलग दुसऱ्यांदा रद्द
- राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा, काँग्रेसच्या आमदाराचे मोदींना पत्र
- ‘नवाब भाई… राष्ट्रवादीच्या आमदारांनीही रेमडीसीवरचा पुरवठा केला,हा औषधांचा साठा कुठून आला?’
- कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आज पासून ‘या’ जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यु’
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत जाहीर करा – रयत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
