Share

‘केंद्र सरकारचं मन मोठं नाही तर सडकं, कुचकं आहे’, संजय राऊतांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली आहे. राऊत म्हणाले, काल पेट्रोल डिझेलचे भाव ५ आणि १० रुपयांनी कमी केले. या ५ रुपयांनी काय होणार? पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर ५ रुपये कमी झाले, जर सर्व देशात भाजपाचा पराभव झाला तर पेट्रोल ५० रुपयांनी कमी होईल. लोकांना कर्ज काढून सन साजरे करावे लागतात.

ते पुढे म्हणाले, मोठ मनं असायला मन असावं लागतं ना, मनच नाही. पेट्रोल डिझेल भाववाढीतून हजारो कोटींनी पैसे कमावले या सरकारने. मोठ्या मनाची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगू नका, तुमचं मन मोठ नाही तर कुजकं आहे, सडकं आहे. किमान पंचविस रुपये कमी शंभर रुपये वाढवायचे आणि ५ रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन?

लोकं पेट्रोल पंपावर येतात, पंधरा पंधरा रुपयांचे पेट्रोल टाकतात, समोर मोदींच्या होल्डींगकडे बघतात आणि मोदी आर्शीवाद देतात आम्हाला मत देल्याची किंमत चुकवा. केंद्राकडेच बोट दाखवावे लागेल ना, पेट्रोल डिझेलचे भाव काही राज्य सरकार ठरवत नाही, धोरनात्मक निर्णय तुम्हीच घेतात ना मग बोट कोणाकडे दाखवायचे फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे बोट दाखवायचे का? असा सवालही यावेळी राऊतांनी उपस्थित केला. महाराष्ट्र सरकारने सतत महागाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शेवटी केंद्र सरकारच या सर्व गोष्टीसाठी जबाबदार आहे. असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!