🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप सरकारवर शरसंधान केले. जम्मू काश्मीर मधील परिस्थिती अतिशय बिकट असून सरकार यावर काहीच बोलत नाही अशी टीका राऊत यांनी मोदीवर केली. तुम्ही ज्या प्रकारे ईडी, सीबीआय, चा गैरवापर करता आहात त्यामुळे तुम्ही त्या संस्था बदनाम केल्या आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामध्ये त्या म्हणतात की ‘सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते, चुकवलेले लाखों रूपये मागच्या दारानं लपत छपत पुन्हा जमा करावे लागले. याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर आहे.आता आदळआपट करून उपयोग नाही जैसी करणी वैसी भरणी
सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते.. चुकवलेले लाखों रूपये मागच्या दारानं लपत छपत पुन्हा जमा करावे लागले…
याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर आहे
आता आदळआपट करून उपयोग नाही..
‘जैसी करणी, वैसी भरणी…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 18, 2021
दरम्यान, चित्रा वाघ यांनी आणखी एक ट्विट करत लिहिले की, ‘महाविकास आघाडी सरकारला इन्कम टॅक्सआणि ईडीची एवढी भिती का वाटतीये? सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनांत चांदणं’दिसतंय केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणा-या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केला आहे. हे ‘अलीबाबा अन् ४० चोरांचं’सरकार..चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकावर सुनावले आहे.दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्वीट वर संजय राऊत कश्या प्रकारे प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- स्रेहलता वसईकरने ‘या’ कारणामुळे घेतला सोशल मीडियापासून दूर होण्याचा निर्णय
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- ‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
