🕒 1 min read
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री स्रेहलता वसईकरने अनेक मलिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत सोयरा बाईसाहेबांची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली होती. या भूमिकेने स्रेहलता घराघरात पोहोचली. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेत अहिल्याबाईच्या सासूबाईची म्हणजे गौतमाबाईंची भूमिका तिने साकारली आहे. मात्र आता स्रेहलताने सोशल मिडीयापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे.
https://www.instagram.com/p/CVIqpkStT0o/?utm_source=ig_web_copy_link
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिनेही माहिती दिली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘अध्यात्मिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी काही काळ ऑफलाइन जात आहे,’ तिचीही पोस्ट पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. सोशल मिडियापासून लांब होण्याचे नेमके कारण स्पष्ट कळू शकले नाही. मात्र तिने घेतलेल्या निर्णयाचे अनेकजण सोशल मिडियावर तिचे कौतक करत आहे.
दरम्यान, संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात तिने साकारलेल्या भानूच्या भूमिकेचेही प्रचंड कौतुक झाले होते. काही हिंदी मालिकेतून अभिनय साकारत असताना तिने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. तिची हि वेगळी भूमिका प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडली होती.
महत्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- ‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
