Share

‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र

Published On: 

सांगोला : भाजप नेते किरीट सोमय्या सतत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे -पवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार असल्याची टीका केली आहे.

ठाकरे-पवार सरकार राज्याला लुटण्याचे काम करीत आहे. सांगोला साखर कारखान्यासह घोटाळ्यांची प्रकरणे आपल्याकडे आली असून, या सर्व घोटाळ्यांचा पाठपुरावा आपण करणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. तेयेथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान यावेळी त्यांनी राज्यातील अनेक मंत्र्यांच्या चौकशा सध्या सुरू असल्याचे म्हटले आहे. अनेक मंत्री सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. सध्याच्या ठाकरे सरकारचे माजी गृहमंत्री फरार आहेत, कमिशनर परदेशात गेले आहेत, पोलिस अधिकारी अटकेत आहेत. हे सरकार आहे की माफिया आहे, असा प्रश्न करून अनेक नेत्यांनी कारखाने लुटण्याचे काम केले असून, पवारांच्या घरात सर्वांचीच बेनामी मालमत्ता असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!