Share

जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…

Published On: 

अबुधाबी : हरयाणा पोलिसांनी क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक केली होती. माजी भारतीय क्रिकेटपटूविरोधात हरियाणाच्या हांसी येथे अनुसूचित जातींविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराजवर गेल्या वर्षी रोहित शर्मासोबत लाइव्ह चॅटमध्ये अनुसूचित जातींवरील युजवेंद्र चहलवर अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप आहे. युवराजला अटक केल्यानंतर हांसी पोलिसांनी त्याची तीन तास हिसार जिओ मेस येथे चौकशी केली. यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माजी क्रिकेटपटूची औपचारिक जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशावरून युवराज सिंग तपासात सामील झाला होता. यावेळी युवीसोबत वकील, सुरक्षा कर्मचारी आणि पाच कर्मचारी सदस्य होते. चौकशीनंतर युवराज सिंह चंदीगडला रवाना झाला.

सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी युवराजसिंग संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. युवराज सिंग याच्यावर अनुसूचित जातींविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप होता. यानंतर रजत कलसन याने युवराजविरुद्ध हांसी पोलीस ठाण्यात SC-ST कायदा आणि IPC च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, युवराजने काही दिवसांनपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माफी मागितली होती. यानंतर युवराज सिंगने हा खटला निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यानंतर उच्च न्यायालयाने युवराजविरुद्ध पोलिसांच्या कारवाईला स्थगिती दिली होती.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!