मुंबई: सध्या सत्ताधारी आणि विरोधकांत कलगीतुरा रंगला आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.
पडद्यामागून होणारी वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे.विरोधी पक्ष म्हणून भाजपा राज्यातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडते म्हणून मूळ मुद्दा सोडून दुसरीकडे लक्ष विचलित करण्याची जुनी खोड आहे. ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवत फिरायची वेळ शिवसेनेवर आली आहे. अशी खोचक टीका केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत केली आहे.
भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवत फिरायची वेळ शिवसेनेवर आली आहे.
अभिमान आहे मा. बाळासाहेबांचा ज्यांनी स्वत: महत्त्वाची पदं नाकारुन सर्वसामन्य शिवसैनिकांना मोठं केलं. आज त्यांचेच चिरंजीव स्वत: शिवसैनिक आहेत असं सांगत मुख्यमंत्रिपद घेतात. मुलगा शिवसैनिक आहे असं २/३— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 18, 2021
यावेळी त्यांनी अभिमान आहे मा. बाळासाहेबांचा ज्यांनी स्वत: महत्त्वाची पदं नाकारुन सर्वसामन्य शिवसैनिकांना मोठं केलं. आज त्यांचेच चिरंजीव स्वत: शिवसैनिक आहेत असं सांगत मुख्यमंत्रिपद घेतात. मुलगा शिवसैनिक आहे असं सांगत त्याला पर्यावरण मंत्री बनवतात. बरं मुख्यमंत्रिपदाला घेण्याला भाजपाचा आक्षेप नाही. पण विश्वासघातकी मार्गानं ज्यांना सत्तेपासून दूर ठेवलं, त्यांनाच सोबत घेऊन पदं मिळवणं याला मर्दानगी म्हणतात का? असा सवालही केशव उपाध्ये यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार


