Share

केंद्रसरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करु नये; लसीकरणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचा टोला

Published On: 

मुंबई   – केंद्रसरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार याची माहिती दिली पाहिजे. केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खाजगी लोकांना खरेदी करुन त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्रसरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले.कधी प्रकाश जावडेकर वेगळं बोलतात तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात.फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.

१२ कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होता मात्र आजपर्यंत किती पुरवठा झाला असा सवाल करतानाच कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!