🕒 1 min read
मुंबई: सध्या भारतात सर्वत्र आयपीएल २०२२ ची चर्चा सुरु आहे. या सीझनबद्दल चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. नुकताच शोएब अख्तरने आयपीएलबाबत बोलताना त्याचा कोलकाता नाईट रायडर्समध्ये झालेला एक किस्सा सांगितला. २००८ मध्ये उदघाटनांच्या सिजनमध्ये तो आयपीएलचा भाग होता.
शोएब अख्तरने (shoaib akhtar) सांगितले की, जेव्हा तो KKR संघात सामील झाला तेव्हा त्याच्यावर पीसीबीने (PCB) बंदी घातली होती. त्यानंतर केकेआरच्या प्रशिक्षकाने सौरवला तो खेळण्यासाठी योग्य नसल्याचे सांगितले होते, “जेव्हा मी केकेआर कॅम्पमध्ये सामील झालो तेव्हा माझ्यावर पीसीबीने बंदी घातली होती आणि मी सामने खेळलो नाही. त्यानंतर जॉन बुकाननने सौरव गांगुलीला सांगितले की तो सामना खेळण्यासाठी योग्य आहे असे मला वाटत नाही. ज्याला गांगुलीने (Sourav ganguly) उत्तर दिले की तो नेहमीच अनफिट असतो, त्याची काळजी करू नका. तो अर्धा अनफिट असला तरी हरकत नाही.”
पाकिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाज शोएब अख्तर हा आयपीएलचा भाग राहिला आहे. २००८ मध्ये पहिल्यांदा जेव्हा आयपीएल खेळवण्यात आले तेव्हा त्यात पाकिस्तानी खेळाडूंनीही सहभाग घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय वादामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना या लीगमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली होती. अख्तरने फक्त तीन आयपीएल सामने खेळले आणि एकूण पाच बळी घेतले, ज्यात दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- घरकुल योजनेचा डीपीआर केंद्र सरकारने रोखला! हे आहे कारण…
- IPL 2022 : काय सांगता..! प्रेक्षकांच्या स्टेडियममधील प्रवेशाबाबत BCCI घेणार ‘असा’ निर्णय!
- IPL 2022 : हैदराबादची पराभवानंतरही होतेय चर्चा ; कारण ‘ती’ परतलीये !
- खंडोबाच्या खंड्या जैशी ज्याची हाय तलवार…” शेर शिवराजचे पहिले गाणे पाहिलतं का?
- भाजप खासदाराचा नवीन लुक बघून उप राष्ट्रपतीही पडले गोंधळात; म्हणाले,”ही दाढी आहे की मास्क?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
