🕒 1 min read
नागपूर : केंद्र सरकारने देशातील शेतक-यांवर लादलेल्या तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधनदरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रॅक्टरसह हजारो शेतक-यांनी भव्य रॅली काढून नागपूर राजभवनला घेराव घातला. इंधनदरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली मांडून भाकरी भाजून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व ऊर्जामंत्री नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री तथा प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मदत, पुनर्वसन आणि बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बसवराज पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, खासदार बाळू धानोरकर आदी नेते व काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, ‘मोदी सरकार सातत्याने संसद आणि संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-या चालणा-या केंद्रातील सरकारला सर्वसामान्य जनतेची नाही तर फक्त निवडक उद्योगपतींची चिंता आहे. शेतक-यांच्या पाठींशी आमचे नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी ताकद उभी केली आहे. आता संघर्षात काँग्रेस पक्ष शेतक-यांसोबत असून कायदे मागे घेतल्याशिवाय हा लढा थांबणार नाही.’
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंचा वारसदार कोण ? पहिल्या पत्नीची मुलगी की करुणा शर्मांचा मुलगा ?
- फडणवीस आणि माझ्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका; पाटलांचा पवारांना इशारा
- शरद पवारांनी नैतिकता पाळत चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा- चंद्रकांत पाटील
- पंतप्रधान मोदी हे उद्योगपतींचे गुलाम; थोरातांची विखारी टीका
- ‘पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरे यांनी लस टोचून घेतल्यानंतरच मी लस टोचून घेईन’


