औरंगाबाद : आज ८ मे रोजी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी चिकलठाणा विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
राज ठाकरेंचा अयोध्याला जाऊन काय फायदा. प्रभू रामचंद्रांनी यांना चांगली बुद्धी द्यावी ही मनोकामना मी बागळतो. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असून या संदर्भात कोणीही बोलायला तयार नाही. मात्र राज ठाकरे दुसऱ्या विषयाचा मोठा विषय करत असून याचा काहीच फायदा होणार नाहीये. राज ठाकरे यांनी मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे ती त्यांनी बदलावी. यासाठी प्रभुरामचंद्र त्याला चांगली बुद्धी दे अशी आशा मी परमेश्वराकडे करतो. असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. केंद्र सरकारने लोकांच्या खिश्यात एवढा हात घातलाय कि लोकं योग्य वेळी योग्य उत्तर देतील आणि प्रायश्चित्त घेतीलच, असेही जयंत पाटील म्हणाले.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध –
भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल माफी मागावी, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली होती. त्यांनतर त्यांनी फेसबुक पोस्ट करत कडाडून विरोधही केला. राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी ५ जूनला चलो अयोध्या महाअभियान आयोजित करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
आता पुन्हा राज ठाकरेंना इशारा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला होता. यावरून आता राजकारण तापलं आहे. पुन्हा एकदा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी इशारा दिला आहे. “राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही” असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

