Share

IPL 2022 SRH vs RCB : ‘त्या’ भयानक पराभवाचा वचपा काढणार बंगळुरू? वाचा हेड-टू-हेड आकडेवारी!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज दुपारी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (SRH vs RCB) यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुपारी साडेतीनपासून खेळवला जाईल. या हंगामात उभय संघांमधील शेवटच्या सामन्यात आरसीबी केवळ ६८ धावांवर ऑलआऊट झाला आणि त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

आयपीएलच्या १५व्या हंगामात, बंगळुरू ११ सामन्यांतून ६ विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद १० सामन्यांतून ५ विजयांसह सहाव्या स्थानावर आहे. हैदराबाद संघाला हा सामना जिंकून प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल करायची आहे. अंतिम-४ शर्यती पाहता आता प्रत्येक सामना खूप महत्त्वाचा आहे. संघाला आपल्या कर्णधाराकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यांमध्ये आतापर्यंत सनरायझर्सने १२ सामने जिंकले आहेत आणि आरसीबीने ८ सामने जिंकले आहेत. सध्याच्या खेळाडूंमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या ९ सामन्यात ३६७ धावा केल्या आहेत. तर बंगळुरूसाठी विराट कोहलीने हैदराबादविरुद्धच्या १९ सामन्यांत ५६९ धावा केल्या आहेत. हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बंगळुरूविरुद्ध हैदराबादकडून सर्वाधिक १७ विकेट घेतल्या आहेत. आरसीबीच्या हर्षल पटेलने हैदराबादविरुद्धच्या ९ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!