Share

नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची भायखळा कारागृहातून ५ मे रोजी सुटका झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यासोबत आमदार रवी राणाही होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून आज (८ मे) डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर नवनीत राणा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा, असेही राणा म्हणाल्या. दरम्यान, नवनीत राणा यांच्या या आव्हानांवर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की,‘नवनीत राणा जे बोलल्या ते हल्लाबोल नसून त्यांच्यातली खाज आहे.आपले मुख्यमंत्री हल्लाबोल करण्यासारखे नाहीत. उद्धव ठाकरे हे त्यांच्या चांगल्या कामामुळे केवळ राज्यातच नाही तर देशातही अव्वल आले, ती खरी दोघांचीही पोटदुखी आहे, एकाचा भोंगा आहे तर दुसऱ्याचा सोंगा आहे आणि अॅम्प्लिफायर तर वेगळाच आहे’, असे पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान, ‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल. रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर सरकारने ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल’, असे टीका नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!