Share

“राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही”; ब्रिजभूषण सिंह यांचा इशारा

Published On: 

मुंबई : भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल माफी मागावी, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली होती. त्यांनतर त्यांनी फेसबुक पोस्ट करत कडाडून विरोधही केला. राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी ५ जूनला चलो अयोध्या महाअभियान आयोजित करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आता पुन्हा राज ठाकरेंना इशारा दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला होता. यावरून आता राजकारण तापलं आहे. पुन्हा एकदा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी इशारा दिला आहे. “राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही” असं त्यांनी म्हटलं आहे.

“उत्तर भारतीय आणि मराठी माणूस यांच्यातील वाद मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी निर्माण केला. हे माझं व्यक्तिगत मत आहे. मी पक्षाशी या संबंधित बोललेलो नाही. मी व्यक्तिगत स्तरावर मोठी तयारी करत आहे. त्यांनी विचार केला नसेल इतकी मोठी तयारी करत आहे. माझ्यासोबत उत्तर भारतीय देखील मोठ्या संख्येने आहेत. पक्षाचं वेगळं मत आहे. पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही. राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही. त्यांनी खेद व्यक्त करावा” असे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!