🕒 1 min read
मुंबई : कोरोना लसच नाही तर वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या मध्ये एन-९५ मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स यांचा समावेश आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांना रुग्णसंख्येपेक्षा जास्त पटीने हे सर्व साहित्य पुरवण्यात आले असल्याचे देखील चव्हाण यांनी म्हटले आहे.
या संदर्भातील आकडेवारी जाहीर करत चव्हाण यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. चव्हाण यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गुजरातला सर्वाधिक मास्क, पीपीई किट आणि व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. या दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यानंतर निवडणुका सुरू असलेल्या पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. तर चौथ्या क्रमांकावर तामिळनाडू आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानंतर केरळ राज्याचा क्रमांक लागत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.
महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत. pic.twitter.com/MdYDR4Ly3W
— Prithviraj Chavan (@prithvrj) April 10, 2021
चव्हाण यांनी केलेल्या आरोपानुसार १००० रुग्णांमागे गुजरातला १३ व्हेंटिलेटर देण्यात आले आहे तर महाराष्ट्राला केवळ दोन व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. यात उत्तर प्रदेशला एक हजार रुग्णांमागे सात व्हेंटिलेटर देण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या असतांना केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला’
- ‘आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवल असतं’
- रेमडेसिव्हिर इंजेक्शन काय आमच्या घरी तयार होत नाही : छगन भुजबळ
- हर्षल पटेलची कमाल कामगिरी ; रोहित शर्माचा 12 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत
- छत्रपती उदयनराजे यांचे ‘कटोरा’ घेत लॉकडाऊन विरोधात आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

