पुणे : देशात विक्रमी कोरोना रुग्णांची भर पडत असून या संकटातून भारत बाहेर पडावा यासाठी जगभरातून प्रार्थना व मदतीचा ओघ सुरु झाला आहे. तर दुसऱ्याबाजूला, देशात आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सध्या धुमशान सुरु आहे. यंदा आयपीएलचे विजेतेपद कोणाकडे जाणार यावरून उत्सुकता शिगेला पोहोचली असून कोरोनाच्या सावटामुळे मोजक्याच स्टेडियमवर सामने खेळवले जात आहेत. आयपीएलचे चाहते फक्त देशातच नाहीतर जगभरात आहेत.
मागील वर्षी कोरोनाच्या धोक्यामुळे IPL चा हंगाम UAE मध्ये खेळवण्यात आला होता. मात्र, यंदा जानेवारी व फेब्रुवारीमध्ये कोरोनाच संकट आटोक्यात असल्याचं चित्र दिसत असल्याने देशातच निर्बंधांसह आयपीएल सामन्यांचा आयोजन करण्यात आलं आहे. तर, देशातील क्रिकेटपटूंसह परदेशी खेळाडूंनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाल्याने IPL चे उर्वरीत सामने रद्द करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
IPL च्या मॅचेसवर केंद्र सरकारने बंदी आणावी. कोरोना सारख्या महामारीच्या काळात IPL च्या मॅचेस कशासाठी व कोणासाठी?? तात्काळ मॅचेस वर बंदी आणायला हवी,आणि जनतेच्या जीवावर श्रीमंत होणाऱ्या क्रिकेटच्या खेळाडूंनी आपला खजिना गोरगरिबांसाठी खुला करायला हवा.@PMOIndia@VijayGoelBJP
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 28, 2021
काही बॉलिवूड कलाकार, परदेशी क्रिकेट खेळाडू यांच्या पाठोपाठ राजकीय नेत्यांनी देखील IPL सामन्यांवर आक्षेप घेतला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी सामन्यांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. ‘IPL च्या मॅचेसवर केंद्र सरकारने बंदी आणावी. कोरोना सारख्या महामारीच्या काळात IPL च्या मॅचेस कशासाठी व कोणासाठी?? तात्काळ मॅचेस वर बंदी आणायला हवी,आणि जनतेच्या जीवावर श्रीमंत होणाऱ्या क्रिकेटच्या खेळाडूंनी आपला खजिना गोरगरिबांसाठी खुला करायला हवा.’ असंही मिटकरी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
- लॉकडाऊन घ्या आणि घरी बसा, बाकी मेलात तरी ती तुमची जबाबदारी; राणेंची बोचरी टीका
- औरंगाबाद ‘मनपा निवडणूक’: शपथपत्र दाखल करण्यासाठी आता फक्त ४ आठवड्यांची मुदत
- ‘एक कोटी देतो, रेमडेसिविर द्या…रुग्णांचे जीव तरी वाचतील’; शिवसेना आमदाराचा संताप
- नायब राज्यपालांच्या हाती एकवटणार आता दिल्लीची सत्ता, नवा कायदा झाला लागू


