Share

लॉकडाऊन घ्या आणि घरी बसा, बाकी मेलात तरी ती तुमची जबाबदारी; राणेंची बोचरी टीका

Published On: 

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. भाजीपाला, इतर दुकानं ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सध्या राज्यात सुरू आहेत. अशात हे निर्बंध 1 मेनंतर उठवले जातील का? असा प्रश्न विचारला जात असताना राज्यात दररोज 60 हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

शिवाय आरोग्य यंत्रणांवरील ताण जैसे थे आहे. सध्या केंद्राने मदतीसाठी पुढाकार घेतल्यानंतर राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठ्यातील तुटवडा काहीसा कमी झाला असला तरी रुग्णालयांमध्ये अद्यापही बेड मिळत नाहीये. काही रुग्ण हे रुग्णालयात बेड मिळत नसल्याने तर काही रुग्णालयांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

स्थिती अद्यापही पूर्ण आटोक्यात न आल्याने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला जाईल असे संकेत राज्याचे  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे.

‘मदत नाही, नियोजन नाही, आरोग्य सेवा नाही फक्त लॉकडाऊन घ्या आणि घरी बसा. आम्ही फक्त केंद्र सरकारवर टीका करणार आणि महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवणार. आमच्याकडे एक रिकामटेकडा संज्या आहे रोज सकाळी न ब्रश करता TV वर येतो. बाकी मेलात तरी चालेल कारण तुम्ही मेलात तर तुमची जबाबदारी.’ असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!