परभणी : गंगाखेड – पालम रस्त्यावरील मौजे नरळद शिवारात कारने बैलगाडीला पाठीमागून जोरदार दिलेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. या बाबत अपघाताची गंगाखेडच्या पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गंगाखेड – पालम रस्त्यावरील मौजे नरळद शिवारात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास शेतातील ज्वारीचे पोते बैलगाडीतून घेऊन जात होते. त्यावेळी यादव गंगाराम काळे (वय 45, रा. नरळद) हे बैलगाडीस पाठीमागून ढकलत होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने (एमएच 03 एआर 6295) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत यादव गंगाराम काळे हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती गंगाखेड पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश राठोड यांच्यासह कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, कारमध्ये तीन व्यक्ती प्रवास करत होत्या. गंगाखेड पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश राठोड हे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वीला संधी नाहीच
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- विमाक्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के इतके वाढवले
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

