औरंगाबाद : लिंबेजळगावाजवळ एका अनोळखी तरुणाचा मृतदेह विहीरीत आढळुन आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. बस स्थानकानजीक वाळेकर यांची गटनं २०६ मधील शेतात असलेल्या विहीरीत मृतदेह आढळला.
ही माहीती पोलीस पाटील यांनी तत्काळ वाळुज पोलीस ठाण्यात कळवताच पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या सह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अग्नीशमनदल व नागरीकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढुन घाटी रुग्णालयात दाखल केला.
अनोळखी तरुणाच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलीसांनी सांगितले. या प्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. तसेच तरुणाची ओळख पटविण्याचे काम देखील पोलीस करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यात घेणे हा तमाम वारकऱ्यांचा अपमान’
- बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण जनसंवाद; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती
- ‘राज्यपालांच्या सगळं लक्षात आहे, फक्त ते आमदारांच्या यादीचे विसरलेत’, ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा टोला
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

