औरंगाबाद : चार दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह गोलटगाव शिवारात विहिरीत आढळला. तरुणाची ओळख पटली असून याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अजय राजू अंबिलढगे वय २१ रा. गोलटगाव ता. जी.औरंगाबाद असे तरुणाचे नाव आहे. अजय हा गुरुवार दि २४ रोजी रात्री अकरा वाजता घरात काहीही न सांगता निघून गेला. अजय रात्रभर घरी न आल्याने घरच्यांनी त्याचा शोधाशोध घेतला परंतु त्याची कुठेही माहिती मिळाली नाही. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती.
दरम्यान, गावा शेजारी असलेल्या अजय साळुंके यांच्या विहिरीत अजयचा मृतदेह आढळला. त्याला विहिरीतून बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अजय हा नववी पर्यंत शिकलेला होता. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.अविनाश चव्हाण करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

