Share

‘लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा मोठा मानू नये’, गृहमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष सल्ला

Published On: 

मुंबई : कोरोनाचे निर्बंध झुगारून दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी भाजपा तसेच मनसेने काही ठिकाणी दहिहंडी साजरी केली. कोरोनाच्या निर्बंधांमुळे सार्वजनिक उत्सवाना राज्य शासनाने बंदी घातली आहे. मात्र कोरोनाचे निर्बंध झुगारून दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी भाजपा आणि मनसेच्या काही गोविंदा पथकांनी थेट राज्य सरकारला आव्हान दिले. त्यामुळे पोलिसांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवून दहीहंडी साजरी करणाऱ्यांवर मुंबईत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले आहे. तर आता भाजपानंतर मनसेनेही मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य करत अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंना फटकारले आहे. ‘सर्व जगामध्ये आपण जी परिस्थिती पाहत आहेत. तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे तिसरी लाट येणार आहे. जर तिसरी लाट आली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. राजकीय पक्षांना आणि नेत्यांना विनंती आहे की त्यांनी लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा मोठा मानू नका आणि त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य करा’ असा सल्ला दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते?
‘राज्यात सगळं काही सुरळीत सुरू आहे. यात्रा निघाताहेत, मेळावे होताहेत. बिल्डर कामं करून घेण्यासाठी सरकारच्या लोकांना भेटताहेत. त्यातून करोना पसरत नाही, पण सण-उत्सव आले की करोना पसरतो. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे. सगळे सण साजरे झालेच पाहिजेत. सरकारला नियम लावायचेच असतील तर सगळ्यांसाठी एकच नियम लावावा. एकाला एक नियम आणि दुसऱ्याला एक नियम असं चालणार नाही,’ असे राज ठाकरे काल मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!