Share

रासपच्या आमदाराच्या पत्नीला तिकीट देत ‘भाजपने’ महादेव जानकरांचे पंख छाटले !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : बारामतीची जागा भाजप ही जागा स्वत: लढवणार की, महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र भाजपने राष्ट्रीय समाज पार्टीचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देवून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

गेल्यावेळी राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामतीतून निवडणूक लढवली होती. जानकर यांचा ६९ हजार मतांनी पराभव झाला. त्यानंतर जानकर यांनी आपणच पुन्हा बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याचं वेळोवेळी जाहीर केलं होतं. मात्र, त्यांच्याच राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देत भाजपनं जानकर यांचे पंख छाटल्याची चर्चा आहे.

कांचन कुल यांचा अल्पपरिचय :

कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. कांचन कुल यांचे शिक्षण बारामतीत झाले असून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली आहे. त्यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. पद्मसिंह पाटील हे कांचन यांचे चुलते आहेत. तसेच उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत असलेले राणा जगजितसिंह हे कांचन यांचे चुलत बंधू आहेत. २००५ साली त्यांचा राहुल कुल यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!