Share

गोव्यातील भाजप सरकार कॅसिनो मालकांचे गुलाम बनले आहेत; राऊतांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई: गोवामधील प्रमोद सावंत सरकारवर गोव्याचे तत्कालिन राज्यपाल आणि सध्याचे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच कोरोना काळात गोवा भाजप सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर निशाना साधत टीका केली आहे.

गोवा येथील सरकारविरोधात जनमानसात तीव्र संताप आहे. कोरोनाची परिस्थिती या सरकारने नीट हाताळली नाही हे तर आहेच, पण तेथील आरोग्य यंत्रणा साफ कोसळून पडली आहे. कोरोनामुळे गोव्याचा मुख्य व्यवसाय असलेल्या पर्यटनावरच कुऱ्हाड पडली. त्यामुळे राज्याचे अर्थकारण जसे बिघडले तसे सामान्य माणसाच्या पोटापाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. लोकांच्या चुली थंडावल्या. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात अमली पदार्थांचा गोव्याभोवती पडलेला विळखा कमी होण्याऐवजी घट्टच होत चालला आहे. गोव्यातील भाजप सरकार कॅसिनो मालकांचे गुलाम बनले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह गडद करणाऱ्या घटना गोव्यात सातत्याने घडत आहेत. तरुण पिढी अमली पदार्थ, जुगाराच्या अधीन होत चालली आहे. गोव्याची परिस्थिती अशी गंभीर व बकाल झाली आहे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोव्यातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करणार, अशी थापेबाजी करीत आहेत. ‘सरकार तुमच्या दारी’ नावाचा एक पडेल प्रयोगही त्यांनी मध्यंतरी करून पाहिला. त्यामुळे गोव्याचे वास्तव झाकले जाईल, असे त्यांना वाटले असावे. वास्तविक भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!