Share

‘भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू’; विनायक राऊतांची खोचक टीका

Published On: 

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राणेंना काल अटक करण्यात आली होती. त्यावरुन भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शेलारांनी ठाकरे सरकारला जोरदार टीका करत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

शेलारांच्या या मागणीनंतर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू आहेत. यांना जे जे लोक विरोध करतील त्यांच्या मागे हे शुक्लकाष्ट लावायचं ही भाजपनं केलेली रणनिती आहे. त्यामुळे त्यांना किती चौकश्या लावायच्या त्या लावू देत,’ अशा शब्दांत विनायक राऊत यांनी शेलारांच्या इशाऱ्याचा समाचार घेतला.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले होते ?

राणेंना झालेली अटक ही बेकायदेशीर पद्धतीने झाली आहे. या अटक सत्रामध्ये मंत्रिमहोदयांनी हस्तक्षेप केलेला दिसतोय. मुंबई उच्च न्यायालयाचा यामध्ये उल्लेख आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा बदनामी करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप यावेळी आशिष शेलार यांनी केला आहे. यासोबतच, ‘या प्रकरणाची सीबीआय चौकशी का होऊ नये? हे सर्व केंद्रीय मंत्र्याबाबत होत असल्यामुळे सीबीआय मार्फत अनिल परब यांच्यापासून ते तेथील स्थानिक आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी आशिष शेलारांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!