इंग्लंड : लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर हेडिंग्ले येथील लीड्स मैदानावर भारताचा संघ अधिक आत्मविश्वासाने उतरला. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडाली. इंग्लंडने लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढत भारताचा पहिला डाव ७८ धावांवर आटोपला आहे. या सामन्यात भारताने मागील संघ कायम ठेवण्यात आला आहे.
गेल्या कित्येक सामन्यानंतर कर्णधारण विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी, पण त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. दोन खेळाडू वगळता इतर कोणत्याही खेळाडूला दोन आकडी संख्या देखील गाठता आली नाही. आणि ज्या खेळाडूंनी दोन आकडी संख्या गाठली ती २० धावांहून अधिक नाही. आता इंग्लंडच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली असून भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे त्यांच्याकडे अधिक धावांनी आघाडी घेण्याची भक्कम स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, रोहित शर्मा याने १०५ चेंडूंमध्ये १९ धावा तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने ५४ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. सलामीवीर के एल राहुलसह मागील सामन्याच्या विजयाचे स्टार मोहम्मद शमी आणि बुमराह हे खाते न उघडताच बाद झाले. या पाच कसोटी सामन्यात भारत १-० ने आघाडीवर असून हा सामना जिंकल्यास ३५ वर्षापूर्वीच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. यापूर्वी १९८६ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला २-० ने पराभूत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी थांबणार नाही…’; उर्वरीत जन आशीर्वाद यात्रेबाबत नारायण राणेंची घोषणा
- ‘सख्खा भाऊ योगी, शहांबद्दल असं बोलत नाही’; राणेंकडून मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या वक्तव्याचे दाखले
- राणे प्रकरणातही शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; ‘विरोधात’ही दानवे-खैरे यांची तोंडे ‘विरुद्ध’ दिशेला!
- ‘देवेंद्र फडणवीस मला मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेल’
- अफगाणी नागरिकांना यापुढे देश सोडून जाण्याची परवानगी देणार नाही – तालिबान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

