काबुल – अफगाणी नागरिकांना यापुढे देश सोडून जाण्याची परवानगी देणार नाही असं तालिबाननं जाहीर केलं आहे. परदशी नागरिक विमानतळावर जाऊ शकतात मात्र अफगाणी नागरिकांसाठी काबूल विमानतळाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे असं तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी सांगितलं.
अफगाणी नागरिकांनी विमानतळावरुन परत फिरावं त्यांना तालिबानकडून कोणताही त्रास होणार नाही असं आवाहन मुजाहिद यांनी केलं आहे. डॉक्टर्स आणि शिक्षणतज्ज्ञांनी देश सोडून जाऊ नये त्यांनी आपापल्या क्षेत्रात अफगाणिस्तानमध्येच काम करावं असं तालिबाननं म्हटलं आहे. दरम्यान सैन्य माघारीची मुदत वाढवायला तालिबाननं नकार दिला असून अमेरिकेनं ही मुदत पाळावी असा इशारा दिला आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानातून 228 भारतीयांसह 626 जणांना अफगाणिस्तानातून देशात आणण्यात आलं आहे. या मध्ये 77 अफगाणी शिखांचा समावेश असल्याचं नागरी हवाई सेवा मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं. अफगाणिस्तानातल्या लोकांच्या मुक्तता मोहिमांना राजकीय रंग देऊ नये, अशी विनंती मोदी यानी केली आहे. अफगाणिस्तानात छळ झालेल्या नागरिकांच्या पाठीशी भारत कायम उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अफगाणिस्तानामधून यापुढे येणाऱ्या प्रवाशांनी या पुढे इ व्हिसा घेऊनच प्रवास करावा, असं सरकारनं कळवलं आहे. अनेक अफगाणी लोकांचे पासपोर्ट हरवल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारने भारतात नसणाऱ्या अफगाणी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द केल्याचं जाहीर केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींच्या मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान दिल्याने सूडबुद्धीने ही कारवाई, भाजप कार्यकर्त्यांचा संताप अनावर!
- नाणेफेक जिंकत विराटने संपवला ‘तो’ इंग्लंडमधील दुष्काळ
- ‘सैराट’ फेम आर्चीच्या हटके लुकने वेधले चाहत्यांचे लक्ष
- हेंडिग्ले कसोटीत नाणेफेक जिंकत विराटचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- ‘भोक तुमच्या फुग्याला पडलंय राऊतसाहेब…’ ; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला


