Share

ओबीसी आरक्षणाचा तिढा ‘या’ महिन्यापर्यंत संपणार; मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितली डेडलाईन

Published On: 

मुंबई : स्थानिक संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार विरोधी पक्षांना सोबत घेऊन प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज दुसऱ्यांदा सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली आहे. यामध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी मांडल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा तिढा कधी सुटणार ? याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ‘निवडणुकांसाठी जून उजाडणार नाही. या संदर्भात सर्वांचं एकमत असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही. मात्र, मार्च, एप्रिलपर्यंत ओबीसी आरक्षणा संदर्भातील सर्व प्रश्न निकाली निघतील,’ असं भाष्य वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

बैठकीला कोणकोणते नेते होते उपस्थित ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पार पडलेल्या या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, नाना पटोले आदी नेते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!