मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया टॉवरजवळ कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटकं आणि याच कारचा मालक मनसुख हिरन याची ठाण्यात झालेली हत्या या प्रकरणात अटकेत असलेला आणि मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझे, सुनील माने यांच्या विरोधात आज आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.
अँटिलिया स्फोटंक आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आरोपींविरोधात यूएपीए कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मासह अन्य ८ जण एनआयएच्या ताब्यात आहेत.
आधी या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक करत होतं. मात्र, त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार, हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला. या दोन्ही प्रकरणातल्या आरोपांवरुन वाझे यांना एनआयएकडून अटक कऱण्यात आली आहे. दरम्यान 9 जून रोजी विशेष न्यायालयाने एनआयएला मनसुख प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले की, आतापर्यंत 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एका टीमने चौकशीसाठी दिल्लीला जाऊन काही लोकांची चौकशीही केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परप्रांतीयांना सरसकट आरक्षण देताच येणार नाही’ ; फडणवीसांनी सांगितला कायदा
- आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार!
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

