Share

खासदार नवनीत राणा यांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी, ‘कामचुकारांची मंत्र्यांकडे तक्रार करणार!’

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : अमरावीत शहरात लागोपाठ दोन दिवस झालेल्या अग्निकांडामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी चिंता व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभाग, कामगार आयुक्तालयाचे अधिकारी, टाउन प्लॅनिंग अधिकारी, अग्निशमन विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. सर्व अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शहराचा विकास आराखडा बदलविणाऱ्या अधिकारी व समिती सदस्यांची मंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचा इशारासुद्धा त्यांनी दिला.

नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या व फायर ऑडिट न करणाऱ्या आस्थापनांची तत्काळ चौकशी करून अग्निशमन यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित आहेत की नाही याची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. १५ वर्षांपासून रखडत व अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेली भुयारी गटार योजना नेमकी कधी पूर्ण होणार व शहरातील सांडपाण्याचा योग्य निचरा होऊन शहर कधी स्वच्छ व रोगराईमुक्त होणार, असा संतप्त सवाल खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना केला.

तसेच पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था दूर करावी व विकासकामांचे गुणवत्तापूर्ण नियोजन करून कामाचा दर्जा उत्तम ठेवावा, असे निर्देश नवनीत राणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. एखादा प्रोजेक्ट किती लांबवावा व त्याचे अंदाजपत्रक किती वाढवावे याला मर्यादा असाव्या व नागरिकांच्या सोयी सुविधांना वेळेचे बंधन पाळून प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

शहर विकास आराखड्यात फेरबदल करून शहराचा श्वास असणारी मोकळी मैदाने, शाळेची आरक्षित सांस्कृतिक, सामाजिक भवन, कचरा डेपो आदींसाठी आरक्षित असणाऱ्या जागा विशिष्ट लोकांच्या खिशात घालण्याचे कटकारस्थान काही समिती सदस्य व अधिकाऱ्यांनी केले. डीपी प्लॅनमध्ये हेराफेरी करणाऱ्या व ठराविक लोकांचा फायदा करणाऱ्या नगररचना अधिकाऱ्यांची खासदार नवनीत राणा यांनी चांगलीच खरडपट्टी काढून शहर आपल्या मालकीचे समजून मनमानी करू नका, अन्यथा गय करणार नाही असा सज्जड दम दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!