Share

राष्ट्रवादीचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय-अनंत गीते

Published On: 

रायगड: शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधी एकत्र होऊ शकत नाही मग सेना आणि काँग्रेस कशी एकत्र होणार. असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. असे विधान सेना नेते अनंत गीते यांनी केले आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही निशाना साधला आहे. शरद पवार हे आमचे नेते होऊच शकत नाहीत. एकत्र येऊन आघाडी सरकार स्थापन करणे म्हणजे सत्तेसाठी तडजोड होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. असे वक्तव्य गीतेंनी केले आहे. यामुळे उपस्थित आघाडी कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या होत्या. या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

२०१९ साली झालेल्या रायगड लोकसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी ४ लाख ८६ हजार ९६८ मते मिळवून शिवसेनेचे अनंत गीते यांना पराभूत केले होते. तर अनंत गीते यांना ४ लाख ५५ हजार ५३० मते मिळाली होती. हा पराभव जिव्हारी लागल्याने तेव्हापासून अनंत गिते अज्ञात वासात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजकारणात दमदार एंट्री केली आहे. मागच्या आठवड्यात चिपळून येथील कुणबी मेळाव्यात गीते यांनी राजकारणात मी पुन्हा सक्रीय होणार असल्याची घोषणा केली होती. मी खासदार नसलो तरी राजकारणाला विराम दिलेला नाही असे गीते म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!