Share

ऑस्ट्रेलियाचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाला मिळाली सर्वात मोठी आनंदाची बातमी

Published On: 

🕒 1 min read

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर ८ गडी राखून विजय मिळवला.ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर गुंडाळल्यावर विजयासाठी भारतासमोर ७० धावांचं माफक आव्हान होतं.

सुरुवातीला दोन धक्के बसल्यावर पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या कर्णधार अजिंक्य रहाणे यानं नवोदित शुभमन गिलच्या साथीनं हे लक्ष्य सहज पार केलं. या विजयायामुळं कसोटी मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी साधली आहे.

पहिल्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या अजिंक्य रहाणेला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, त्यामुळे रहाणेचा मुलाघ मेडल देऊन सन्मान करण्यात आला.

दरम्यान, या विजयासह टीम इंडियाला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियात क्वारंटाइन असलेला रोहित शर्मा भारतीय संघात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर करत आपण पुनरागमनासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!