नवी दिल्ली: देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली असली तरी कंपन्यांकडून दरवाढीचा सपाटा सुरुच आहे. दिवसेदिवस पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ होत आहे. एक लिटर पेट्रोलचा भाव १०० रुपयांच्या पुढे गेला आहे. तरी आजही वाढ सातत्याने सुरूच आहे. दिल्लीत पेट्रोलच्या किंमतींत लिटरमागे ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
पेट्रोलचे प्रतिलीटर दर
दिल्ली – 99.16
मुंबई – 105.25
कोलकाता – 92.92
चेन्नई – 94.54
डिझेलचे प्रतिलीटर दर
दिल्ली –89.18
मुंबई – 96.72
कोलकाता – 92.03
चेन्नई –93.72
कोरोना काळात पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरील कस्टम आणि एक्साइज ड्यूटीच्या माध्यमाने केंद्र सरकारच्या कमाईत 56 टक्क्यांहूनही अधिक वाढ झाली आहे. इनडायरेक्ट टॅक्सच्या माध्यमाने सरकारची कमाई 2.88 लाख कोटी रुपये झाली आहे.
सध्या देशात महागाई वाढत चालल्याने सामान्य माणसाचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. यातच दूध, खाद्यतेल आणि गॅस सिलेंडर या रोजच्या जीवनातल्या वस्तूच्या किंमतीत वाढ होत असल्याने सर्व सामान्य व्यक्तीकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- क्वारंटाईनमधून बाहेर येताच भारतीय खेळाडूंची पूल पार्टी ; फोटो होतोय व्हायरल
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

