नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक हुकल्यानंतर त्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, शतक न झाल्यामुळे दु:ख झाले. परंतू मी व्यक्तिगत रेकॉर्डकडे जास्त लक्ष देत नाही.
पंतने मोहाली येथे श्रीलंकाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ताबडतोब फलंदाजी करत ९७ चेंडूत ९६ धावा केल्या. ५ नंबरला आलेल्या पंतने सुरुवातीला थोडा वेळ घेतला. परंतु नंतर त्याने श्रीलंकन गोलंदाजांवर आक्रमक हल्ला चढवला. त्याच्या या खेळीचा अंत सुरंगा लकमलने त्रिफळा उडवून केला. या खेळी दरम्यान त्याने ४ जबरदस्त षटकार लगावले.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्याला एक प्रश्न विचारण्यात आला की, शतक हुकले त्याचे दु:ख वाटत नाही का? यावर पंत म्हणाला की, मी याबद्दल जास्त विचार करत नाही. मी व्यक्तिगत रेकॉर्डलाही जास्त महत्व देत नाही. कधी कधी वाटते की मी शतक बनवू शकलो असतो. परंतु यावर मी जास्त लक्ष देण्याचा विचार करत नाही. पंत आतापर्यंत ९० ते १०० च्या दरम्यान बरायचं वेळा बाद झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

