🕒 1 min read
मुंबई: ४ मार्च म्हणजेच शुक्रवारी क्रिकेट जगताने दोन महान खेळाडूंना गमावले आहे . सकाळी ऑस्ट्रेलियन दिग्गज यष्टिरक्षक रॉड मार्शला यांच्या निधनाची वार्ता समोर आली आणि नंतर संध्याकाळी उशिरा बातमी आली की फिरकीचा जादूगार समजला जाणारा शेन वॉर्नही क्रिकेट जगताला परक करून गेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजण दिग्गजांना अंतिम निरोप देताना दिसले. यानंतर भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी रॉड मार्श आणि शेन वॉर्न यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी एक मिनिट मौन पाळले. यासोबतच दोन्ही संघाचे खेळाडू हातात काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले आहेत.
बीसीसीआयनेही (BCCI) ट्विट करत शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय आणि श्रीलंका संघाने काळीफीत बांधत मौन पाळलेला फोटो पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी कॅप्शनमध्ये लिहले “रॉडनी मार्श (Rodney marsh) आणि शेन वॉर्न (shane warne) यांच्यासाठी पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी एक मिनिटाचे मौन पाळण्यात आले, ज्यांचे काल निधन झाले. भारतीय क्रिकेट संघ आज काळ्या हातपट्ट्या घालणार आहे,”
A minute’s silence was observed before the start of play on Day 2 of the first Test for Rodney Marsh and Shane Warne who passed away yesterday. The Indian Cricket Team will also be wearing black armbands today.@Paytm #INDvSL pic.twitter.com/VnUzuqwArC
— BCCI (@BCCI) March 5, 2022
शुक्रवारी शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनाने जगभरातील क्रिकेट चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. वॉर्नने १९९२ मध्ये सिडनी येथे भारताविरुद्ध जबरदस्त कसोटी पदार्पण केले. वॉर्नने १४५ कसोटी आणि १९४ एकदिवसीय सामने खेळले. ज्यात त्याने १००० हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. त्याने ४०००हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा देखील केल्या आहेत आणि तो ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आणि ऑस्ट्रेलियाच्या १९९९ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता.
महत्वाच्या बातम्या
- “हा विषय विधानसभेत मांडू,” भाजप कार्यकर्त्यावरील हल्ल्याप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया
- खासदार रामदास तडस उतरले कुस्तीच्या आखाड्यात
- पिकांवरील रोग व बुरशी वाढली आहे? तर त्वरित करा हे उपाय, अन्यथा…
- “झुकेंगे नही म्हणणारे…”; व्यंगचित्र ट्विट करत भातखळकरांची शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका
- ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला पाकिस्तानी चाहते म्हणाले “अपना ही घर समझो”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
