औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव मधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. २५ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळास वचन दिले होते की येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या मागण्यांना मंजूरी देऊ. परंतु १५ दिवस उलटूनही आंदोलकांना मागणीबाबत साधा फोनही करण्यात आलेला नाही. त्यामुळे साष्टपिंपळगाव येथील मराठा समाजाने स्थगित केलेले आमरण उपोषण आजपासून (दि. १०) सुरू केले आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईस आता पुन्हा एकदा धार मिळाली असून आमरण उपोषणाचा एकमेव निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगावमधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू होते. येथील आंदोलनाला सरकार गांभिर्याने घेत नसल्याने मराठा तरूणांचा आरक्षण विषय निकाली काढण्यासाठी सर्वात आधी शरद पवार यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी बारामतीला निघण्यापूर्वीच आंदोलकांना अटक झाली.
त्यानंतर काही दिवसांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साष्टपिंपळगाव शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीदरम्यान आपल्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या. २ दिवसांनंतर लेखी आश्वासन देण्याचे कबूल करण्यात आले. मात्र १५ दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा साष्टपिंपळगाव मधील आंदोलकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
या आमरण उपोषणात मनोज पाटील जरांगे वय ४० , मुक्ताबाई नामदेव ढेपे वय ६५, रावसाहेब अंबादास सुळे वय ३७ तर मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या ४२ कुटूंबाच्या वतीने २ जणांचे शिष्टमंडळ उपोषणासाठी आलेले आहे. यात डिगांबर माणिकराव कदम वय ७६, आण्णा शिवाजी काटे वय २२ या पाच जणांनी आजपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अमृता फडणवीस म्हणतात, ‘कुछ दाग अच्छे लगते है !’
- केंद्रिय पथकाच्या सर्वेक्षणानंतर झोपलेले प्रशासन होणार का जागे ?
- ठाकरे सरकारच्या काळातच महाराष्ट्राची अधिक बदनामी झाली – रामदास आठवले
- गडकरींचा धडाका : नागपुरकरांना मिळणार तब्बल 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स
- दिव्यांग विद्यार्थ्याच्या निर्घुण खुनाचा झाला उलगडा; आरोपी अटकेत


