Share

अमृता फडणवीस म्हणतात, ‘कुछ दाग अच्छे लगते है !’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मिडीयावर कायम चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांचा काल वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्ताने त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिला. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर सर्वांचे आभार मानले आहेत.

अमृता यांनी त्यांच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला असावा कारण त्यांनी सेलिब्रेशनसी संबंधित फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी केकचे ठिपके ठेवलेले दिसत आहेत. हाच फोटो त्यांनी त्यांच्या ट्वीट केला आणि ‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है !’ असा मजकूर त्यांनी लिहला. हा फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही अकाउंटवर शेअर केला आहे.

हा फोटो अमृता फडणवीस यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करताच नेहमीप्रमाणे नेटकर्यांनी त्यांच्या पोस्ट वर कमेंटचा पाऊस पडला आहे. अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर अनेकांनी त्यांना नेहमीप्रमाणे ट्रोल देखील केले असल्याचे आता पाहायला मिळत आहे.

दरम्यान अमृता फडणवीस ट्विटरवर वारंवार शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधतात. दोन दिवसांपूर्वी राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा यावरुन राजकीय वातावरण पेटलेलं असताना अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हिंदीत निशाणा साधला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!