Share

गडकरींचा धडाका : नागपुरकरांना मिळणार तब्बल 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स

Published On: 

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज साठ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील मोठ्या प्रमाणार तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड झाला आहे.

रेमडीसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली असताना सुध्दा उपलब्ध होत नाही.नेमका काळाबाजार कसा होतोय किंवा काय कारवाई सरकार करतेय याबाबत कोणतीही स्पष्टता होवू शकत नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर आल्याने  नातेवाईकांची होत असलेली वणवण आणि लूटमार थांबविण्यासाठी शासनानेच कडक पावले उचलावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक एका इंजेक्शनकरता लांबच्या लांब रांगा लावत आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा आणि रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवा, अशी मागणी आता नातेवाईक करत आहेत.

राज्याच्या इतर भागांप्रमाणे नागपुरात देखील या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा पुन्हा उपलब्ध करुन देण्यासाठी थेट सन फार्मा कंपनीच्या मालकाशी चर्चा केली आहे.

या चर्चेनंतर नागपुरात लवकरच एकूण 10 हजार रेमेडिसिव्हीरची इंजेक्शन्स उपलब्ध होणार आहेत. आजच्या आज तत्काळ 5 हजार इंजेक्शन सन फार्माकडून दिले जाणार आहेत. तर उर्वरित 5 हजार इंजेक्शन्स आगामी दोन दिवसांत उपलब्ध करुन दिले जातील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!