Share

दिव्यांग विद्यार्थ्याच्या निर्घुण खुनाचा झाला उलगडा; आरोपी अटकेत

Published On: 

औरंगाबाद: परीक्षेसाठी शहरात आलेल्या विकास चव्हाण या तरुणाच्या निर्घुण खुनाचा उलगडा झाला असून त्याच्या मारेकऱ्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तरुणाची हत्या लुटमारीच्या उद्देशाने केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परीक्षेला जायला उशीर होत असल्याने विकास चव्हाणने एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली होती आणि त्या दुचाकीस्वाराने कब्रस्तानात जाऊन विकासची निर्घुणपणे हत्या केली. या प्रकरणी सिटीचौक पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.

शाहरुख फिरोज खान (वय २८) असे मारेकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजता विकासची परीक्षा असल्याने त्याला वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक होते. पैश्याची कमतरता असल्याने तो बस्थानाकावारच झोपला होता. सकाळी परीक्षा केंद्राकडे जायला तो रिक्षा शोधात होता, पण कुठलाच रिक्षाचालक जायला तयार होत नव्हता, हा सर्व प्रकार आरोपी शाहरुख बघत होता. संधीचा फायदा घेत त्याने परीक्षा केंद्रावर सोडतो असे सांगितले, लवकर जाता येईल म्हणून विकास सुद्धा तयार झाला. पण हा निर्णय त्याच्या आयुष्यावर बेतणार होता हे त्याला माहित नव्हते. आरोपीने दुचाकी थेट कब्रस्थानाजवळ नेली, गाडी थांबवत त्याने विकासला आत ओढले व धारदार चाकूने त्याच्या पोटात तसेच गळ्यावर वार केले. त्यातच मृत विकास रक्तबंबाळ अवस्थेत पडला.

दिवस उजाडत असल्याचे पाहून मारेकऱ्याने त्याला तिथेच मारून टाकत त्याच्याकडील सर्व रोख रक्कम व वस्तू घेत घटनास्थळावरून पळ काढला. हा सर्व प्रकार बस्थानक परिसरातील एका सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी दिसत असल्याने त्याला पकडणे पोलिसांना सोपे झाले. त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला अटक केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!