🕒 1 min read
औरंगाबाद : गतवर्षी कोरोनाने हाहाकार माजवला होता. सरकारने नागरिकांवर जबरदस्तीने लॉकडाउन लावले. त्यावेळी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची झळ औरंगाबादकर आत्तापर्यंत सोसत होते. आणि आता पुन्हा तेच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाने आपले रूप बदलले आहे.
मात्र गतवर्षी करण्यात येणाऱ्या उपाययोजना जसे निर्जंतुकीकरण, रुग्णांची संपर्क साखळी शोधून काढणे, क्वारन्टाईन करणे, पत्रे लावून वसाहती बंद करणे इत्यादी गोष्टी यंदा बंद आहेत. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे. केंद्रिय पथकाच्या पाहणीत महापालिकेच्या या गोष्टी आल्या असल्याचे सूत्रांकडून समजते. यानंतर तरी झोपलेली सुस्त आरोग्य यंत्रणा जागी होते का हे पाहणे गरजेचे आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात औरंगाबाद शहरात पहिला कोरोना रुग्ण आढळला. त्यानंतर हि संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. त्यानंतर मनपाने टास्क फोर्स स्थापन केले. या पथकाद्वारे कॉन्टॅक्ट मॅपिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हायरिस्क व लो रिस्क शोधण्याचे काम ३५ कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत होते. शहर बसचा वापर ॲब्युलन्स प्रमाणे करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे मोठा फायदा झाला.
एक हजार मोबाईल फिवर क्लिनिकव्दारे थर्मलगन, ऑक्सीमिटरच्या साह्याने एक लाख ४,८८९ ज्येष्ठ नागरिकाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. एमएचएमएच अॅप तयार करण्यात आले. ज्या भागात रुग्ण आढळत होते त्या त्याठिकाणी निर्जंतुकीकरण, पत्रे लावून भाग सील करणे, त्याठिकाणी पोलीसांची नियुक्ती इत्यादी गोष्टी कटाक्षाने केल्या जात होत्या. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत गेली. आणि पालिका थंडावली.
कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका तज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानुसार फेब्रुवारीपासून पुन्हा कोर्टाने डोके वर काढले. सध्या दररोज हजारांच्या घरात रुग्णसंख्या निघत आहे. शहरातील जवळपास सर्वच भागांमधून रुग्ण निघत आहेत. मात्र पालिकेने या नवीन स्ट्रेनमध्ये वसाहतींचे निर्जंतुकीकरण, संपर्कात आलेल्या हाय रिस्क, लो रिस्क व्यक्तींची कोरोना चाचणी या गोष्टी बंदच केल्याचे पाहायला मिळत आहे.
केंद्रीय पथकाने शुक्रवारी (दि.९) कंटेन्मेंट झोन्सची पाहणी केली. त्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांची ये-जा बंद करा. कडक निर्बंधांचे पालन करा, अशी स्पष्ट ताकीद केंद्रीय पथकाने पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली आहे. रुग्णसंख्येचा विस्फोट होण्याआधी आता तरी पालिकेला जाग यावी.
महत्त्वाच्या बातम्या
- मावळ नंतर आता पंढरपूरमध्ये रंगणार शेळके विरुद्ध भेगडे सामना
- वैद्यकीय उपकरणे देण्यात देखील केंद्राने दुजाभाव केला, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
- विभागीय आयुक्तांनी आपल्याला जी माहिती दिली तीच सांगितली, दावा फोल ठरल्यानंतर महापौरांचे विभागीय आयुक्तांकडे बोट
- स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाहणीसाठी आलेल्या पथकाने मनपा अधिकाऱ्यांना दिला ‘चकवा’!
- कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

