उस्मानाबाद: मागील काही दिवसांपासून रस्त्यावरच्या अपघातात वाढ झाली आहे. या वाढत्या अपघाताचे प्रमाण अधिक होत चालले आहे.काळ अशीच एक दुर्दैवी घटना उस्मानाबाद येथे घडली. भरधाव कार हॉटेलात जावून धडकल्याने २ व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही घटना उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे शनिवारी रात्री घडली. जनता कर्फ्यू असल्याने बाजारपेठ बंद होती. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही व मोठा अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, लातूरच्या दिशेने जात असलेली भरधाव कार शनिवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ढोकी येथून जात होती. दरम्यान, ही कार पेट्रोल पंप चौक पास केल्यावर तेरणा कारखान्याच्या जागेत असलेल्या खाणावळ व चहाच्या हॉटेलात घुसली. त्यामुळे हॉटेल चालक बरकत तांबोळी व पोपट शिंदे यांच्या शेडचे मोठे नुकसान झाले आहे.
जनता कर्फ्यु असल्याने व दुकाने बंद असल्याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून हॉटेलात घुसलेली कार बाहेर काढली. कार चालक हा अपघात होताच घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महत्त्वाच्या बातम्या
- मावळ नंतर आता पंढरपूरमध्ये रंगणार शेळके विरुद्ध भेगडे सामना
- वैद्यकीय उपकरणे देण्यात देखील केंद्राने दुजाभाव केला, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
- ठाकरे सरकारच्या काळातच महाराष्ट्राची अधिक बदनामी झाली – रामदास आठवले
- रैना त्याच फॉर्ममध्ये ; परताचं केले धमाकेदार अर्धशतक
- धवन-पृथ्वीची तुफान खेळी; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

