Share

उस्मानाबाद; कारवाईच्या धसक्याने शेतशिवारात लग्नाचा बार, निर्बंधांना जनतेकडून ठेंगा

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येपुढे प्रशासन हतबल झाले आहे. कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वारंवार निर्बंध लावण्यात येत आहेत. मात्र या निर्बंधांना जनतेकडून ठेंगा दाखविण्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात स्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायती असमर्थ ठरत आहेत. यामुळे लग्न समारंभाची धूम जोरात सुरू आहे. विवाह सोहळ्यात केवळ ५० व्यक्तींना येण्याची परवानगी असल्यामुळे ग्रामीण भागात चक्क शेतशिवारात विवाह सोहळे होत आहेत. या विवाह सोहळ्यांना शेकडोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळींची गर्दी देखील होत आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विवाह सोहळ्यास ५० पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. अन्यथा प्रशासनाकडून कुटुंबासह वऱ्हाडी मंडळी, बँडवाले, घोडा मालक, केटर्स यांच्यावर देखील कारवाई आदेश प्रशासनाने दिले आहेत.

विवाह सोहळ्यात उपस्थितीवर निर्बंध असले तरीही ग्रामीण भागात मात्र धुमधडाक्यात लग्नाचे बार उडत आहेत. गावात किंवा मंगल कार्यालयात विवाह सोहळ्याचे आयोजन न करता शेतशिवारात विवाह सोहळे थाटात उरकले जात आहेत. या विवाह सोहळ्यांना शेकडोंच्या संख्येने गर्दी देखील होत आहे. बँड बाजा लावून धुमधडाक्यात लग्न लावले जात आहे. गावगाडा म्हणून गावात किमान ५० घरांना ‘चुलीस आमंत्रण’ देण्याची रित ग्रामीण भागात आहे. शिवाय गावातील इतर घरांमध्ये देखील लग्नाचे आमंत्रण दिले जाते. यामुळे किमान २०० गावकारी लग्नात एकत्र येतात.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!