मुंबई : शिखर धवन आणि पृथ्वी शॉच्या मदतीने दिल्ली कॅपिटलने आयपीएलच्या 14 व्या सत्रातील पहिल्या सामन्यात चेन्नईचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 7 गडी गमावल्यानंतर 188 धावांची सन्माननीय धावसंख्या उभारली. यानंतर धवन आणि पृथ्वीच्या फलंदाजीमुळे दिल्लीने हे लक्ष्य सहज 18.4 षटकांत गाठले. धवनने 85 धावा केल्या आणि पृथ्वीने 72 धावांची तुफानी खेळी केली. दिल्लीने 7 गडी राखून चेन्नईचा या सामन्यात दारुण पराभव केला.
आयपीएलच्या 14 व्या पर्वातील हा दुसरा सामना अविस्मरणीय सामना ठरला. कारणही तसेच आहे. या सामन्यात सख्ख्या भावांमधील लढाई बघायला मिळाली. इंग्लंडकडून खेळणारे दोन सख्ख्ये भाऊ सॅम करन आणि टॉम करन दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या लढतीत चेन्नईकडून सॅम करन टॉम करनवर तुटून पडला. टॉम करनच्या एकाच ओव्हरमध्ये सॅमने 23 धावा ठोकल्या. मात्र, असे असूनदेखील चेन्नईला पराभवचा सामना करावा लागला.
यानंतर सुरेश रैना आणि मोईन अली यांनी 53 धावांची भागीदारी करत संघाचा ताबा घेतला. मोईन अलीने 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी साकारली. धवनच्या हाती मोईनला रविचंद्रन अश्विनने झेलबाद केले. यानंतर रैनाने अंबाती रायुडू (23 धावा) यांच्यासह चौथ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. रैनाने 36 बॉलच्या डावात 3 चौकार आणि चार षटकार ठोकले. परंतु अखेरच्या काही षटकांत धावांची गरज असताना चेन्नईच्या डावाची सूत्र सॅम करनने हाती घेतली. त्याने टॉमच्या एकाच ओव्हरमध्ये दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.
महत्त्वाच्या बातम्या
- मावळ नंतर आता पंढरपूरमध्ये रंगणार शेळके विरुद्ध भेगडे सामना
- वैद्यकीय उपकरणे देण्यात देखील केंद्राने दुजाभाव केला, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
- ठाकरे सरकारच्या काळातच महाराष्ट्राची अधिक बदनामी झाली – रामदास आठवले
- रैना त्याच फॉर्ममध्ये ; परताचं केले धमाकेदार अर्धशतक
- धवन-पृथ्वीची तुफान खेळी; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय


