औरंंगाबाद : हज यात्रेच्या नावाखाली कुटुंबाला तब्बल १३ लाख ५० हजारांचा गंडा घातल्या प्रकरणी अलबशीर टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या मालक अब्बास अली वाहीद अली हाश्मी (वय ३८, रा. चांदमारी, नंदनवन कॉलनी) याने सादर केलेला नियमीत जामीन अर्ज मुख्य न्यायादंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी फेटाळला.
सय्यद जमालोद्दीन गफ्फार सय्यद अब्दुल गफ्फार (वय ३१, रा. पंढरपुर एमआयडीसी वाळूज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २०१७ मध्ये ते व त्यांचे आई-वडील आणि भावाचे हजर यात्रेला जाण्याचे ठरले होते. मात्र त्यांचा हजर कमिटी मार्फत नंबर लागला नाही.
त्यामुळे सय्यद जमालोद्दीन गफ्फार व त्यांचे नातेवाईकांनी पैठण गेट येथील अलबशीर टुर्स या ट्रॅव्हल्सचा मालक अब्बास अली याच्याकडे संपर्क साधला त्याने हज ला पाठविण्यासाठी सय्यद जमालोद्दीन गफ्फार व इतरांकडून पैसे घेतले मात्र अब्बास अली हाश्मी यांनी त्यांना हजला न नेता त्यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- मागील विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी केलेली ‘ती’ चूक आता ते पुन्हा करणार नाहीत ?
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

