मुंबई : पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १४ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेला व प्रकरण उघड होताच भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदीला आता भारताच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचे कुटुंबीय बँकेला गंडा घालून २०१७ साली डिसेंबर महिन्यात देशाबाहेर फरार झाले होते. यानंतर, दोन वर्षांपूर्वी नीरव मोदी यांना ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमधून १३ मार्च २०१९ रोजी अटक केली होती.
त्याला भारताकडे सोपवले जावे यासाठी विशेष प्रयत्न केले जात होते. अखेर आज या प्रयत्नांना यश आले आहे. नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने मान्यता दिली होती. नीरव मोदी विरोधात भारतात एक खटला चालू आहे, ज्याचे उत्तर त्याला द्यावे लागेल, असंही लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितले होते. नीरव मोदी याच्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचणे, असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.
परंतु आता नीरव मोदी याने प्रत्यर्पण टाळण्यासाठी लंडन हायकोर्टाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अपील करण्यासाठी अर्ज केला आहे. एप्रिलमध्येच ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी नीरव मोदी यांना भारतात हद्दपार करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली.
क्राउन प्रॉसेक्यूशन सर्विस (सीपीएस) ने ही अपील दाखल केल्याची पुष्टी केली आहे, परंतु उच्च न्यायालयातील न्यायाधीश, ज्यांना यावर निर्णय घ्यायचा आहे, त्यांना अद्याप खटला सोपविण्यात आलेला नाही. ५० वर्षीय नीरव मोदी सध्या दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहात बंद आहे. फेब्रुवारीत वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी कोर्टाचे न्यायाधीश सॅम गूजी यांनी नीरव मोदी यांच्या प्रत्यर्पणाचा आदेश देताना हा निर्णय घेतला होता की,’ मोदीला भारतीय कोर्टासमोर उत्तर द्यावे लागेल आणि ब्रिटिश कायद्यानुसार प्रत्यर्पण थांबवणे त्यांच्या प्रकरणात लागू होणार नाही.’ असे सांगण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- मंठा रुग्णालयाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल; ऑक्सिजन प्लँटसह कार्डियाक रुग्णवाहिका होणार उपलब्ध
- दिलासादायक! भोकरदन येथे होणार ऑक्सिजन बेड्सची सुविधा
- कोरोना योद्ध्यांप्रमाणे वकिलांना विमा कवच देण्याची मागणी
- दिल्ली पोलिस ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारच्या शोधात
- मुंबई इंडियन्सचा खेळाडू पियुष चावलाच्या वडिलांचे कोरोनाच्या संसर्गामुळे दुर्दैवी निधन


