🕒 1 min read
मुंबई : देशात कोरोनाची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अशातच कोरोंना योद्धा पोलिस, डॉक्टर्स आणि नर्स यांचे काम कौतुक करण्यासारखे आहे. कोंरोंनाच्या या संकट काळात डॉक्टर्स अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहे. याबद्दल गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मुंबई महापालिकेच्या जम्बाे कोविड रुग्णालयाच्या कामाचे कौतुक करत पत्र लिहिले आहे.
लता मंगेशकर यांनी स्वहस्ताक्षरात एक पत्र लिहले आहे. ‘आपण महाराष्ट्रासाठी, दिवस-रात्र काम करीत आहात. ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते’ असं दीदी म्हणाल्या आहेत.

सध्याच्या या परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने कोरोना विषाणूशी लढा देत आहे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दीदींनी सुद्धा पत्र लिहीत वांद्रे-कुर्ला कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश डेरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे डॉक्टरांवर प्रचंड ताण आला आहे असे असताना देखील हार न मानता ते लढत आहे. या परिस्थितीत आपणही डॉक्टरांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
राज्यात निर्माण होत असलेल्या वैदयकीय अपुऱ्या सेवांमुळे काही दिवसांपूर्वीच लता मंगेशकर यांनी कोविड १९ साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाख रुपयांची मदत केली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- राहुल तेवातियाने केलं खुलेआम प्रपोजल ; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
- ‘गडकरींचा सल्ला राज्यातील 106 बेरोजगार, लवारीस ट्रोलर्स व त्यांच्या अहंकारी वाचाळविरांनीही अंगीकारावा’
- शिवसेनेच्या झुंजार नेत्या सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आईच्या आठवणीत सोनू झाला भावुक : शेअर केला आईने लिहिलेल्या पत्रांचा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
